शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, 1079 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 08:34 IST

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 ...

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण 1079 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणातून आपलं नशिब आजमावत आहेत. भाजपाकडून 9 मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या 3 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी 76.28 टक्के मतदान झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान होत असून 11 डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे.  राज्यात यंदा बहुतांश पक्षांनी तरुण उमेदवारांवर जास्त विश्वास दाखविला आहे. आजच्या निवडणुकीत थोडेथोडके नव्हे तर 42 टक्के उमेदवार हे चाळिशीच्या आतील आहेत. त्यापैकी 11 टक्के उमेदवार 25 ते 30 याच वयोगटातील आहेत. ‘एडीआर’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडमधील दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकांतील 72 जागांवर एकूण 1 हजार 79 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील 1 हजार 69 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार 42.40 टक्के उमेदवार हे 25 ते 40 या वयोगटातील आहेत, तर 515 उमेदवार हे 41 ते 60 या वयाचे आहेत. केवळ एक उमेदवार 80 हून अधिक वयाचा आहे. यंदा 11.72 म्हणजेच 125 उमेदवार तिशीच्या आतील आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस