शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:04 IST

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला.

राजनांदगाव: छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पुलावर आदळल्यानंतर एका कारने पेट घेतला, या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तीन मुलींसह पती-पत्नी एका लग्न समारंभातून घरी परतत असताना हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री राजनांदगाव खैरागड रोडवरील थेलकाडीह पोलीस स्टेशन अंतर्गत सिंगारपूर गावात हा अपघात झाला. लग्नातून परतत असताना अल्टो गाडी पुलावर आदळल्यानंतर गाडीने पेट घेतला. यात खैरागडच्या गोलबाजार येथील रहिवासी असलेल्या कोचर कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. हे कुटुंब बालोद येथील एका लग्न समारंभातून घरी परतत होते. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन 20-25 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. राजनांदगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय महादेवा यांनी सांगितले की, पोलिस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेचा तपास करत आहेत. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल. 

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूfireआग