Chhattisgarh Raid: Income Tax Department will call some people for inquiry | छत्तीसगड धाडसत्र : प्राप्तिकर विभाग काही लोकांना चौकशीसाठी पाचारण करणार

छत्तीसगड धाडसत्र : प्राप्तिकर विभाग काही लोकांना चौकशीसाठी पाचारण करणार

रायपूर/नवी दिल्ली : प्राप्तिकर विभाग लवकरच छत्तीसगढमधील काही सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांना चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागाने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. दरमहा त्यांना बेहिशोबी रक्कम दिली जात होती, असा दावा प्राप्तिकर विभागाने केला होता.

व्यावसायिक बलदेव सिंह भाटिया ऊर्फ पप्पू भाटिया यांनी स्पष्ट केले की, माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर धाडी टाकण्यात आल्या, हे वास्तविक चुकीचे आहे. रायपूरमधील पोलीस अधिकाऱ्यांनी अगोदर असे सांगितले की, पप्पू भाटियाशी संबंधित ठिकाणांवरही २७ फेब्रुवारी रोजी धाडी टाकण्यात आल्या होत्या. तथापि, हे ठिकाण अमोलख भाटियाशी संबंधित होते.
याप्रकरणी प्राप्तिकर विभाग लवकरच काही लोकांना चौकशीसाठी पाचारण करणार आहे. धाडसत्रानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या निवेदनात धाडीतून १५० कोटींहून अधिक बेहिशोबी व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)

Web Title: Chhattisgarh Raid: Income Tax Department will call some people for inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.