भीषण अपघात! छत्तीसगडमध्ये लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश, दोन वैमानिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 23:22 IST2022-05-12T22:35:57+5:302022-05-12T23:22:01+5:30
हेलिकॉप्टर कोसळताच विमानतळावर खळबळ उडाली; अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू

भीषण अपघात! छत्तीसगडमध्ये लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश, दोन वैमानिकांचा मृत्यू
रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश झालं. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होताच विमानतळावर खळबळ माजली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.
रात्री ९ वाजून १० मिनिटांनी हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन ए. पी. श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'रायपूरच्या विमानतळावर स्टेट हेलिकॉप्टर कोसळल्याची दु:खद माहिती मिळाली. यामध्ये आमचे दोन वैमानिक गोपाल कृष्ण पांडा आणि ए. पी. श्रीवास्तव यांचं दु:खद निधन झालं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या संकटातून सावरण्याची शक्ती इश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.