शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वयोवृद्ध वडिलांवरच दाखल झाला गुन्हा, मुख्यमंत्री म्हणाले, कायद्यापेक्षा मोठा कुणी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 17:26 IST

Chhattisgarh News: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरोधात रायपूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देएका विशिष्ट्य समुहाविरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला हा गुन्हा रायपूर डीडीनगर पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी कलम ५०५ आणि १५३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलागेल्या महिन्यामध्ये लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नंदकुमार बघेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ब्राह्मण समाजाविरोधात केले होते आक्षेपार्ह विधान

रायपूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरोधात रायपूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार बघेल यांच्यावर एका विशिष्ट्य समुहाविरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सर्व ब्राह्मण समाज’ कडून देण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर रायपूर डीडीनगर पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी कलम ५०५ आणि १५३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Chhattisgarh, the FIR was filed  against the father of the Chief Minister Bhupesh Baghel, the Chief Minister said, there is no one greater than the law)

दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही. त्यांचे ८६ वर्षीय वडीलही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांच्या कथित विधानावर पोलीस योग्य ती कारवाई करतील. वडिलांसोबत माझे वैचारिक मतभेद आधीपासून आहेत. हे सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे मलाही दु:ख झाले आहे.  कायद्यापेक्षा मोठा कुणीही नाही. मी मुलगा म्हणून त्यांचा आदर करतो. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या चुकीला माफ करता येणार नाही.

गेल्या महिन्यामध्ये लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नंदकुमार बघेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, आता मत आमचे आणि राज्य तुमचं असं चालणार नाही. ब्राह्मण परकीय आहेत. ज्या प्रकारे इंग्रज येथून गेले, तसेच तेसुद्धा जातील. ब्रा्ह्मणांनी वेळीच सुधरावे, नाहीतर त्यांनी येथून जाण्यासाठी तयार राहावे. ब्राह्मण आम्हाला अस्पृश्य समजतात. आमचे सारे हक्क हिरावून घेतात. आता गावामध्येही अभियान चालवून ब्राह्मणांवर बहिष्कार टाकू.

नंदकुमार बघेल यांच्या या वादग्रस्त विधानावर संपूर्ण राज्यातील ब्राह्मणनांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बघेल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. आता रायपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी