शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही"; कालीचरण महाराजावर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 12:19 IST

Bhupesh Baghel And Kalicharan Maharaj : महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालीचरण महाराजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही बघेल यांनी म्हटलं आहे. आता एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कटाप्रमाणे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भूपेश बघेल यांनी केला आहे. चौकशीनंतर संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

राम सुंदर दास हे भाजपाचे आमदार 

आयोजकांनी या कार्यक्रमाचं संरक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती त्यामध्ये महंत राम सुंदर दास यांचाही समावेश होता. राम सुंदर दास हे भाजपाचे आमदार आहेत. सनातन धर्मासंदर्भात चर्चा घडवून आणली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्ये केली जातील, गोडसे आणि गांधींबद्दल या कार्यक्रमात चर्चा होईल असं वाटलं नव्हतं. धर्म संसदेमधील चर्चेत गांधी आणि गोडसेंचा उल्लेख कसा आला? सनातन धर्मावर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या या कार्यक्रमामध्ये राजकीय चर्चा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री बघेल यांनी केला.

धर्म संसदेचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. ज्या पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरण्यात आले ते सामान्य व्यक्तींना हे पटण्यासारखं नाहीय, असंही मुख्यमंत्री बघेल म्हणाले. "अशाप्रकारे गुंड भगवं वस्त्र धारण करुन अशी भाषा वापरत असतील तर त्यांना संत म्हणता येणार नाही. आयोजकांनाही अशा कार्यक्रमांमध्ये अशा व्यक्तींना बोलवलं पाहिजे ज्यांच्यामुळे समाजाला फायदा होईल. मात्र अशा कार्यक्रमांना बोलवण्यात आलेली लोक भगवी वस्त्रं धारण करुन अशी वक्तव्य करणार असतील त्यांना संत नाही, गुंड म्हणावं लागेल. गुंडांनी भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही" असं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी