गेम खेळताना मोबाइलचा स्फोट होऊन 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:34 IST2018-04-11T17:34:22+5:302018-04-11T17:34:22+5:30

मोबाइल चार्जिंगला ठेवून गेम खेळत होता.

Chhattisgarh boy dies after mobile phone explodes | गेम खेळताना मोबाइलचा स्फोट होऊन 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

गेम खेळताना मोबाइलचा स्फोट होऊन 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रायपूर- मोबाइल फोनवर गेम खेळत असताना मोबाइलचा स्फोट होऊन एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी छत्तीसगडमधील कोरीया जिल्ह्यात घडली आहे. रवी सोनवान असं मुलाचं नाव असून तो खुत्रापरा गावातील रहिवाली आहे. रवी सोमवारी रात्री मोबाइल चार्जिंगला ठेवून गेम खेळत होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. 

 रवी गेम खेळत असताना फोन चार्जिंगला लावला होता. त्याचवेळी मोठा स्फोट झाला आणि मोबाइल रवीच्या हातातच फुटला. हा स्फोट इतका भीषण होता की, रवीच्या पोटाचा काही भाग बाहेर आला होता, तशाच अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या पण मंगळवारी रवीचा मृत्यू झाला. या स्फोटात रवीला गेम खेळत असताना बघत असणारा त्याचा मित्रही जखमी झाला आहे. 

दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या रवीच्या मित्राच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. 
 

Web Title: Chhattisgarh boy dies after mobile phone explodes