Chhattisgarh : रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट; CRPF चे सहा जवान गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:30 AM2021-10-16T11:30:48+5:302021-10-16T11:41:38+5:30

6 CRPF personnel injured in blast at Raipur railway station : मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 211 व्या बटालियनचे जवान विशेष ट्रेनने जम्मूला जात होते.

Chhattisgarh: Blast hits CRPF special train at Raipur railway station, 4 personnel injured | Chhattisgarh : रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट; CRPF चे सहा जवान गंभीर जखमी

Chhattisgarh : रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट; CRPF चे सहा जवान गंभीर जखमी

Next

रायपूर : छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर रेल्वे स्टेशनवर (Raipur Railway Station) एका ट्रेनमध्ये अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच, या स्फोटात सीआरपीएफचे (CRPF) सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. (Chhattisgarh: Blast hits CRPF special train at Raipur railway station, 4 personnel injured)

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 211 व्या बटालियनचे जवान विशेष ट्रेनने जम्मूला जात होते. यावेळी रायपूर रेल्वे स्टेशनवर ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबली असता शिफ्टिंग दरम्यान डेटोनेटर बॉक्समध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, डेटोनेटर बॉक्स फुटल्याने हा स्फोट झाला. स्फोटानंतर स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर ट्रेन सकाळी 7.15 मिनिटांनी पुढे रवाना करण्यात आली. या स्फोटात कोणत्याही सामान्य नागरिकाला नुकसान झालेले नाही.

जखमी झालेल्या जवानांपैंकी हवालदार विकास चौहान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चवन विकास लक्ष्मण, रमेश लाल, रविंद्र कर, सुशील, दिनेश कुमार पॅकरा हे किरकोळ जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे उच्च अधिकारी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी 17 जूनला सिकंदराबादहून दरभंगा जंक्शनवर पोहोचलेल्या सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेसच्या पार्सल व्हॅनमधून उतरवलेल्या रेडीमेड कापडाच्या पॅकेटमध्ये स्फोट झाला होता. एक्सप्रेस 1:18 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबली. त्यानंतर पार्सल व्हॅनमधून मालाचे पॅकेट उतरवले जाऊ लागले. पहाटे 3:25 वाजता रेडीमेड कपड्यांचे एक पॅकेट फुटले. या दरभंगा रेल्वे स्टेशनवरील पार्सल स्फोटाचे 'पाकिस्तान कनेक्शन' देखील समोर आले होते.

Web Title: Chhattisgarh: Blast hits CRPF special train at Raipur railway station, 4 personnel injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app