शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
3
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
4
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
5
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
7
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
8
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
9
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
10
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
11
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
12
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
13
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
15
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
16
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
17
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
18
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
19
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
20
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रवेशासाठी काँग्रेस आमदाराला 10 कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर, ऑडिओ क्लिपने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:37 IST

छत्तीसगडमधल्या निवडणुकीचे पडघम जसजसे वाजू लागलेत, तसतसे राजकीय पक्षांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यात आता काँग्रेस आमदाराची एक कथित ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

रायपूर- छत्तीसगडमधल्या निवडणुकीचे पडघम जसजसे वाजू लागलेत, तसतसे राजकीय पक्षांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यात आता काँग्रेस आमदाराची एक कथित ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऑडिओ क्लिप राज्याचे गृहमंत्री रामसेवक यांच्या आजारावर उपचार करणारे कंबल बाबा आणि काँग्रेस आमदार चिंतामणी महाराजांशी संबंधित आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे छत्तीसगडचं राजकारण ढवळून निघालं आहे.खरं तर या कथित क्लिपमधून कंबल बाबा लुंड्रा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चिंतामणी महाराज यांना भाजपामध्ये सहभागी होण्याची ऑफर देत असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्यांना मंत्रिपदाचंही आमिष देण्यात आलंय. या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कंबल बाबा म्हणतात, तुमच्या अटीनुसार तुम्हाला काहीही खर्च येणार नाही. तुम्हाला मंत्री बनवण्याची जबाबदारी आमची आहे.आता तुमची इच्छा...चिंतामणी महाराज- मी तिथे जाताच सर्व फोटो समोर येतील. त्यावर कंबल बाबा म्हणाले, तुमचा कुठेही फोटो आला तर जबाबदारी माझी असेल. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये कंबल बाबा यांनी छत्तीसगड काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रामदयाल उइके यांच्या भाजपा प्रवेशाबाबतही विधान केलं आहे. उइकेंनी 10 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं आश्वासनानंतर भाजपामध्ये प्रवेश केला, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. परंतु या क्लिपमध्ये काँग्रेसबरोबर विश्वासघात करणार नसल्याचंही चिंतामणी महाराज म्हणाल्याचं समोर आलं आहे.रमन सिंह बोलले, बाबांशी भाजपाचा संबंध नाहीरमन सिंह म्हणाले, कंबल बाब आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही. तर आमचे 65 आमदार जिंकून येतील. देशात अनेक बाबा असे फिरत आहेत. त्यांचे भाजपाशी काहीही देणे-घेणे नाही. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड