Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:56 PM2018-12-11T14:56:25+5:302018-12-11T15:16:48+5:30

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं निर्णायक आघाडी मिळवण्याच्या मार्गावर आहे.

Chhattisgarh Assembly Election Results 2018: BJP's big loss in Chhattisgarh for five reasons | Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव 

Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव 

googlenewsNext

रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस निर्णायक आघाडी मिळवण्याच्या मार्गावर आहे. छत्तीसगडच्या 90 जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 46 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसनं बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस जवळपास 66 जागांवर पुढे असून, भाजपाला फक्त 18 जागांवर आघाडी मिळवण्यात यश आलं आहे. तर बसपा-जकांछला पाच जागांवर विजय मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपाला 15 वर्षांनंतर छत्तीसगडमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. त्यासाठी महत्त्वाची 5 कारणं भाजपाला महागात पडली आहे.  

  • शेतकऱ्यांची नाराजी- शेतकरी वर्ग भाजपावर नाराज आहे. त्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. 
  • तरुणांवर रोजगाराचं संकट- छत्तीसगडमध्ये रोजगार उपलब्ध नसल्याची मोठी किंमत भाजपाला मोजावी लागली आहे. रोजगार नसल्यानं अनेकांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे. बाहेर आलेल्या लोकांना सरकार नोकऱ्या उपलब्ध करून देते. तर त्यांनी इथेच रोजगार तयार करण्याची जनतेची मागणी आहे. 
  • सरकारची दबंगगिरी- आदिवासींवर सरकार करत असलेली बळजबरी भाजपाला महागात पडली आहे. त्यामुळे दगडफेकीच्या घटना घडत असतात. तसेच छत्तीसगडमध्ये मोठ्या संख्येनं लोक स्थलांतरित होत आहेत. 
  • सरकारी कर्मचारी, पोलिसांचं आंदोलन- निवडणुकीच्या पूर्वी सरकारी कर्मचारी आणि पोलिसांनी पुकारलेल्या आंदोलनाचा भाजपाला फटका बसला आहे. 
  • सरकारविरोधातील वातावरण- 15 वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी उतावीळ असलेल्या भाजपाला जनतेत असलेलं विरोधातील वातावरण चांगलं भोवलं आहे. भाजपा नेते कितीही नाकारत असले तरी त्याचा फटका भाजपाला बसला आहे. 

Web Title: Chhattisgarh Assembly Election Results 2018: BJP's big loss in Chhattisgarh for five reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.