Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 09:11 PM2018-12-11T21:11:36+5:302018-12-11T21:13:11+5:30

छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. 

Chhattisgarh Assembly Election Results 2018: Accepts Moral Responsibility of BJP's Loss | Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो'

Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो'

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. छत्तीसगडच्या 90 जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 46 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी स्वीकारली आहे. छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. 




आम्ही सलग तीनवेळा सत्तेत राहिलो. जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. काँग्रेसने जनेतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असे सिंह यांनी म्हटले आहे. याचबरोबर, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला असल्याचेही यावेळी रमण सिंह यांनी सांगितले. 



 

Web Title: Chhattisgarh Assembly Election Results 2018: Accepts Moral Responsibility of BJP's Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.