शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षासाठी काय'पण'! भाजपा उमेदवार पराभूत झाल्यास 'हा' गडी कापणार मिशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 17:45 IST

रायगढ जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर

रायगढ: छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यातील खरसिया विधानसभा मतदारसंघाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून तरुण उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उमेश पटेल मैदानात आहेत. तर भाजपानं जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिलेल्या ओ. पी. चौधरींना तिकीट दिलं आहे. चौधरींच्या विजयासाठी भाजपानं पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळेच चौधरीच निवडणूक जिंकतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. श्रवण श्रीवानी यांनी एक अजब पण केला आहे. चौधरी पराभूत झाल्यास आपण मिशी कापू, असं श्रीवानी यांनी म्हटलं आहे. डॉ. श्रवण श्रीवानी हे भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी ओ. पी. चौधरी यांच्या विजयाची खात्री आहे. त्यामुळेच चौधरी पराभूत झाले, तर आपण मिशी कापू, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. आपल्याला मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. 'मतदारांनी ज्या पद्धतीनं चौधरी यांना पाठिंबा दिला आहे, ते पाहता त्यांचा विजय पक्का आहे. जर त्यांचा पराभव झाला, तर आयुष्यभर मिशांशिवाय फिरेन,' असा पण श्रीवानी यांनी केला आहे. काँग्रेसचे उमेश पटेल आणि भाजपाचे ओ. पी. चौधरी हे समवयस्क आहेत. दोन तरुण उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. हे दोन्ही नेते मतदारसंघात लोकप्रिय असल्यानं निवडणुकीच्या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. खरसिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र चौधरी यांनी दिलेल्या आव्हानामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. याआधी हा मतदारसंघ काँग्रेसनं अगदी लिलया जिंकला होता. मात्र आता भाजपानं कंबर कसल्यानं काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. 11 डिसेंबरला छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे.  

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस