Chhatisgarh gang rapes minor girl, two arrested in Hyderabad | हैदराबादनंतर छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत 

हैदराबादनंतर छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत 

बिलासपूरः छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये हैदराबाद बलात्कारसारखी निर्दयी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बिलासपूरच्या पेंड्रातल्या गौरेला ठाण्याच्या क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या मुलीसोबत निर्भया प्रकरणासारखं कृष्णकृत्य केलं आहे. त्यानंतर तिला तिकडे सोडून ते पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

1 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपींना 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केलं आहे. या प्रकरणी आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेव्हा पीडिता घराच्या जवळच असलेल्या शेतात गायीला चरण्यासाठी घेऊन गेली असता त्यांनी संधीचा फायदा घेत तिच्यासोबत हे क्रूरकृत्य केलं आहे. 28 वर्षीय राय सिंह आणि 20 वर्षीय मनोज वाकरे यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असून, आत्येला पाहून आरोपींनी पलायन केलं.  


पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडिता वारंवार असह्य वेदनांनी ओरडत होती. घटनास्थळावरून काही अंतरावर असलेल्या आत्येनं पीडितेचा आवाज ऐकला आणि ती जंगलाच्या दिशेनं येताना पाहून आरोपी पळून गेले. आत्या पीडितेला घटनास्थळावरून लागलीच पोलीस स्टेशनला घेऊन गेली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोरेला ठाणे प्रभारी अमित पाटले म्हणाले, पीडितेला थोडं कमी ऐकायला येतं, मूकबधिर शिक्षकांनाही बोलावण्यात आलं होतं. महिला पोलीस तिचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.   
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chhatisgarh gang rapes minor girl, two arrested in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.