"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:21 IST2024-10-01T17:15:07+5:302024-10-01T17:21:13+5:30

एक विवाहित महिला आपल्याच दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मूल हवं आहे.

chhatarpur wife ran away with her brother in law in the desire of beautiful child | "तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...

फोटो - अमर उजाला

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला आपल्याच दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मूल हवं आहे. महिलेचा दीर खूप देखणा आहे, त्यामुळे तिला त्याच्यासोबत राहायचं आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी पळून गेली आहे. पण ती त्याला आता विष प्राशन करून अडकवण्याची धमकी देत ​​आहे. त्यामुळे त्याने पत्नीपासून आपल्याला वाचवण्याची विनंती केली आहे. 

महिला आपल्या पतीला सोडून दिरासोबत घरातून पळून गेली आहे. लग्नाला दहा वर्षे झाल्यावरही तिला मूल झालं नाही. ती म्हणते की, तिला एक सुंदर मूल हवं आहे पण तिचा नवरा देखणा नाही. नवऱ्यापेक्षा दीर जास्त देखणा आहे. त्यामुळे तिला तिच्या दिराकडून आता मूल हवं आहे. ती दिरावर प्रेम करू लागली. हा सर्व प्रकार पाहून सासूने सुनेला हे करण्यापासून रोखलं, तेव्हा दोघेही घरातून पळून गेले. या घटनेनंतर आता संपूर्ण कुटुंब न्याय मागण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचलं आहे.

सीताराम कॉलनीत राहणारा २८ वर्षीय राजेंद्र कुशवाह कुटुंबासह एसपी कार्यालयात पोहोचला आणि सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी मीना कुशवाहसोबत लग्न झालं होतं, जी आता त्याच्या लहान भावासह पळून गेली आहे. आता ती मेसेजच्या माध्यमातून आम्हाला आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी एसपी कार्यालय गाठलं आहे. एक तर तिने चुकीचं केलं आणि दिरासोबत पळून गेली आणि आता ती आम्हाला धमकी देऊन त्रास देत आहे. 

पती म्हणाला की, मला खूप काळजी वाटायची. सर्व काही सुरळीत करण्यासाठी, मी सर्वकाही केलं. पण काहीही फायदा झाला नाही. पत्नीने सांगितलं की, मला तुझ्यापासून सुटका हवी आहे. मला माझं प्रेम म्हणजे तुमचा धाकटा भाऊ आणि माझा दीर याच्याकडून मूल हवं आहे. तो तुझ्यापेक्षा सुंदर दिसतो. त्याच्यापासून मला सुंदर मूल होईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. 
 

Web Title: chhatarpur wife ran away with her brother in law in the desire of beautiful child