हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:11 IST2025-06-08T13:05:45+5:302025-06-08T13:11:53+5:30

Health Insurance: लाईफ-स्टाईलमधील बदल, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे लोक लहान वयातच अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा आरोग्य विमा चांगला असणे महत्त्वाचे आहे. पण आरोग्य विमा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा....

Check these things while taking health insurance, otherwise... | हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासा, अन्यथा...

हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासा, अन्यथा...

- चंद्रकांत दडस
(उपसंपादक)
लाईफ-स्टाईलमधील बदल, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे लोक लहान वयातच अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा आरोग्य विमा चांगला असणे महत्त्वाचे आहे. पण आरोग्य विमा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा....

योग्य विमा कसा निवडावा
- विमा कंपनीचा तीन वर्षांचा सरासरी क्लेम सेटलमेंट रेशो ९७% पेक्षा
जास्त असावा.
- ९७% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये क्लेमचे पैसे ३० दिवसांच्या आत द्यायला हवेत.
त्यात कोणती वैशिष्ट्ये असावीत?
-आयसीयूसह हॉस्पिटलमधील खोलीच्या भाड्यावर कोणतीही मर्यादा नसावी.
-पॉलिसीमध्ये कोणतेही को-पेमेंटकिंवा डिटक्टिबल्स नसावेत.
- ६० दिवसांचे प्री हॉस्टिटलायझेशन कव्हरेज आणि १८० दिवसांचे पोस्ट हॉस्टिटलायझेशन कव्हरेज असावे.
-जास्तीत जास्त वेटिंग पीरियड ३० दिवसांचा असावा. क्रिटिकल आजारांसाठी हा कालावधी जास्तीत जास्त ९० दिवस असावा.
आधीच असलेल्या आजारांसाठी वेटिंग पीरियड ३ वर्षे असावा.
- रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हँडग्लोल्व्ह, सिरिंज, मास्क, इत्यादींचे कव्हरेज असावे.
-नो-क्लेम बोनस दरवर्षी किमान ५०% किंवा त्याहून अधिक असावा.
-कॅशलेस, अनलिमिटेड रेस्टोरेशन आणि रिम्बर्समेंट सुविधा असावी.
-डेकेअर, क्रिटिकल इलनेस रायडर असावे. आजारावर कोणतेही कॅपिंग नसावे.
-पॉलिसीधारकांकडून येणाऱ्या तक्रारींची संख्या १०,००० दाव्यांमध्ये २० पेक्षा कमी असावी. विमा कंपनीची वार्षिक उलाढाल किमान ७५०० कोटी रुपये असावी.

Web Title: Check these things while taking health insurance, otherwise...

टॅग्स :Healthआरोग्य