तरुणांना फसविणारा शिक्षक गजाआड

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:52+5:302015-02-14T23:51:52+5:30

गंगापूर : नोकरीचे आमिष दाखवून नांदेड येथील तरुणांना फसवून फरार झालेला आरोपी शिक्षक भाऊसाहेब जयराम देवरे यास गंगापूर पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केले.

The cheating teacher of the youth | तरुणांना फसविणारा शिक्षक गजाआड

तरुणांना फसविणारा शिक्षक गजाआड

गापूर : नोकरीचे आमिष दाखवून नांदेड येथील तरुणांना फसवून फरार झालेला आरोपी शिक्षक भाऊसाहेब जयराम देवरे यास गंगापूर पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केले.
शहरातील जयसिंगनगर परिसरात राहत असलेला शिक्षक भाऊसाहेब देवरे याने नांदेड येथील बेद्रे व त्याच्या साथीदारांना शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून १० लाख रुपये घेतले होते. दोन वर्षे उलटल्यावरही नोकरी मिळत नाही, असा समज होऊन आपली फसवणूक झाली. म्हणून बेद्रे यांनी शिक्षक देवरे याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच देवरे याने पलायन केले होते. १३ फेब्रुवारी रोजी देवरे शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शिताफीने त्यास पकडून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पो.नि. विजयकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. पंडित सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The cheating teacher of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.