विमानाची तिकीटे काढायला लावून फसवणूक

By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30

पुणे : परदेशवारीसाठी कंपनीच्या सदस्यांसाठी वीस तिकीटे काढायला लावून ट्रॅव्हल कंपनीची साडेसात लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Cheating by plugging aircraft tickets | विमानाची तिकीटे काढायला लावून फसवणूक

विमानाची तिकीटे काढायला लावून फसवणूक

णे : परदेशवारीसाठी कंपनीच्या सदस्यांसाठी वीस तिकीटे काढायला लावून ट्रॅव्हल कंपनीची साडेसात लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जेम्स जोसेफ डिसुजा (रा. श्रद्धा सोसायटी, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साधना पेठकर (वय ४५, रा. एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. पेठकर यांचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल बुकींगचे काम करतात. आरोपी जेम्स याने पेठकर यांना संपर्क साधून डार्क ऑरजेस हॉस्पिटॅलिटी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीच्या ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय व डोमेस्टीक अशा एकूण वीस तिकीटांचे बुकींग करायला सांगितले. त्यानुसार पेठकर यांनी साडेसात रुपयांची ही तिकीटे बुक केली. परंतु जेम्स याने या बुकींगचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली.
-------
कर्जाच्या बहाण्याने फसवणूक
पुणे : शुन्य टक्के व्याजदराने ५० लाखांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला सात लाख ३९ हजारांना गंडवण्यात आले. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य राणा, पुजा, रॉयल क्लब यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमित लबडे (वय ३५, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. अमित यांना आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यांना शुन्य टक्के व्याजाने ५० लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून सात लाख ३९ हजार ९८२ रुपये उकळले. त्यांना कर्ज न देता फसवणूक केली. हा प्रकार १५ डिसेंबर २०१३ ते १९ मार्च २०१५ दरम्यान घडला.

Web Title: Cheating by plugging aircraft tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.