तुफान राडा! काँग्रेस आमदाराची सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी; कर्मचाऱ्याचा फोडला डोळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 04:16 PM2021-10-27T16:16:42+5:302021-10-27T16:20:19+5:30

Congress MLA Vinod Chandrakar : काँग्रेस आमदाराने एका सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

chattisgarh mahasamund congress mla vinod chandrakar accused of assault | तुफान राडा! काँग्रेस आमदाराची सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी; कर्मचाऱ्याचा फोडला डोळा 

तुफान राडा! काँग्रेस आमदाराची सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी; कर्मचाऱ्याचा फोडला डोळा 

Next

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये एक तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस आमदाराने एका सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये त्याने एका कर्मचाऱ्याचा डोळाच फोडला आहे. छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसचे आमदार विनोद चंद्राकर यांनी सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी केल्याची घटना घडली आहे. महासमुंद जिल्ह्यातील ही संतापजनक घटना आहे. कर्मचारी मात्र यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या समर्थकांसहीत उत्पादन शुल्क कार्यालयात घुसून इथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विनोद चंद्राकर यांच्यावर करण्यात आला आहे. मारहाणी दरम्यान एका कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचंही समोर आलं आहे. जखमी झालेले लीलीराम शाहू हे सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून काम करतात. सोशल मीडियावर या राड्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

"मला मारहाण केली आणि माझा मोबाईलही हिसकावून घेतला"

जखमी कर्मचारी लीलीराम शाहू यांनी "महासमुंदचे आमदार विनोद चंद्राकर सहकारी दीपक ठाकूर आणि इतर काही लोकांसोबत सरकारी कार्यालयात घुसले. त्यांनी मला मारहाण केली आणि माझा मोबाईलही हिसकावून घेतला. मी एक्साइज ऑफिसमध्ये ऑपरेटर पदावर काम करतो" असं म्हटलं आहे. मारहाण करताना आमदार देखील पाहायला मिळत आहेत. 

कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, या घटनेविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दारुच्या दुकानांच्या बाबतीत उत्पादन शुल्क कार्यालयातील कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे काम करत नसल्याची आमदार चंद्राकर यांची तक्रार होती. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: chattisgarh mahasamund congress mla vinod chandrakar accused of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.