नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच चरणजीतसिंग चन्नी यांची निवड- हरीश रावत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 08:26 PM2021-09-19T20:26:46+5:302021-09-19T20:28:30+5:30

उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, पंजाबला मिळणार दोन उपमुख्यमंत्री

Charanjit Singh Channi was selected with the consent of Navjyot Singh Sidhu - Harish Rawat | नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच चरणजीतसिंग चन्नी यांची निवड- हरीश रावत

नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच चरणजीतसिंग चन्नी यांची निवड- हरीश रावत

Next

नवी दिल्ली: पंबाजमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. यासह, पंजाबमध्ये आता दोन उपमुख्यमंत्रीदेखील केले जातील. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी एनडीटीव्हीशी बातचीतदरम्यान ही माहिती दिली. 

बातचीतदरम्यान ते म्हणाले की, पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही बनवावे अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार, आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. पण, अद्याप या दोन्ही नावांवर चर्चा झालेली नाही. सर्वात आधी सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शपथ घेतील, त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल.

सिद्धूंच्यी सहमतीने चन्नींची निवड
तसेच, हरीश रावत पुढे म्हणाले की, चरणजीत सिंग चन्नींच्या नावावर पक्षातील प्रत्येकजण सहमत आहे. चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समतीनेच ठरवण्यात आल्याचं ते म्हणाले. याशिवाय, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना भेटायला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अमरिंदर यांच्या चन्नींना शुभेच्छा
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी चरणजीत सिंग चन्नी यांना पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, चन्नींनी राज्याची सीमा आणि पंजाबच्या लोकांचे रक्षण करावे, असंही ते म्हणाले.

Web Title: Charanjit Singh Channi was selected with the consent of Navjyot Singh Sidhu - Harish Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.