कृषी विद्यापीठात चारापिके कार्यशाळा

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30

राहुरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ४ सप्टेंबर या दरम्यान राहुरी येथे चारा पीक राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़

Charakachi Workshop at Agricultural University | कृषी विद्यापीठात चारापिके कार्यशाळा

कृषी विद्यापीठात चारापिके कार्यशाळा

हुरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ४ सप्टेंबर या दरम्यान राहुरी येथे चारा पीक राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़
कार्यशाळेचे उद्घाटन उपमहासंचालक डॉ़ जे.एस़ संधू यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ़ तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे़ सहाय्यक महासंचालक डॉ़ आय़ एस़ सोळंकी, डॉ़ जे़ एस़ चौहान, डॉ़ पी़ के. घोष , डॉ़ ए़ के.राम मार्गदर्शन करणार आहेत.चारा पिके संशोधन व उपाययोजना या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती डॉ़ राजेंद्र पाटील व प्रा़ अजित सोनोन यांनी दिली़
---------------
पगार थकल्याने कर्मचार्‍यांचा मोर्चा
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क ार्यक्षेत्रातील ९ जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांचे पगार थकल्याने राहुरी येथे सोमवारी मोर्चा काढण्यात आला़ ८ सप्टेंबरपर्यंत पगार करण्याची ग्वाही नियंत्रक डी़ जी़ निर्मळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़
कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचे पगार थकल्याबद्दल मोर्चाने जाऊन जाब विचारण्यात आला़ ऑनलाईन पगार सुरू करायचे असल्याने पगार थकल्याचे निर्मळ यांनी सांगितले़ त्यावर अन्य तीन कृषी विद्यापीठाचे पगार दिले जातात, मग राहुरीचे का दिले जात नाहीत, असा सवाल व्यक्त के ला़ पगार करण्याचा अधिकार कुलगुरूंचा असल्याचे उत्तर निर्मळ यांनी दिले़
प्रशासनाशी डॉ़ चिंतामणी देवकर, महावीर चव्हाण, एम़ आऱ बेल्हेकर व डॉ़ राजीव नाईक यांनी चर्चा केली़ चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला़

Web Title: Charakachi Workshop at Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.