शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:49 IST

मणिपूरच्या खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये मीतेई संघटनेच्या नेत्यासह अनेक जणांना अटक केल्यानंतर हिंसाचार उसळला.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. शनिवारी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला, त्यानंतर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आणि पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली.

शनिवारी रात्री मेतेई संघटनेच्या नेत्या अरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यांवर आग लावली, बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. त्यानंतर हिंसक संघर्ष सुरू झाला.

मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली

आंदोलकांनी प्रशासनाला स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये अनेक आंदोलक उभे राहून स्वतःवर पेट्रोल ओतत असल्याचे दिसत आहे.

शनिवारी रात्री उशिरा अरंबाई टेंगगोल यांना अटक केल्यानंतर इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यानंतर, राजधानी इम्फाळच्या अनेक भागात निदर्शकांचे पोलिसांशी संघर्ष झाला. इम्फाळच्या खुराई लामलोंग भागात, निदर्शकांच्या संतप्त जमावाने बस जाळल्या, टायर जाळून रस्ते अडवले आणि सुरक्षा दलांशी संघर्ष केला.

निदर्शक इथेच थांबले नाहीत तर ते इंफाळ विमानतळाच्या तुलिहाल गेटबाहेर जमले. निदर्शकांनी रात्री विमानतळ रस्त्यावरील वाहतूक रोखली त्यांनी तिथेच रात्र काढली. 

राजधानीत वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान, लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बिष्णुपूर जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंगमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार