उंडणगाव प्रभाग रचना व आरक्षणात बदल
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
उंडणगाव : येथील आरक्षणावर सहमती होत नसल्याने चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावर आक्षेप असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार यात पुन्हा बदल करण्यात आला आहे.
उंडणगाव प्रभाग रचना व आरक्षणात बदल
उंडणगाव : येथील आरक्षणावर सहमती होत नसल्याने चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावर आक्षेप असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार यात पुन्हा बदल करण्यात आला आहे.सहमती होत नसल्याने आरक्षण रखडले होते. चिठ्ठ्या टाकून हे आरक्षण जाहीर झाले. यावर अजगर झारेकर यांनी आक्षेप घेत याबाबत तहसीलदार कार्यालयात अर्ज दिला होता. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार येथे प्रभाग रचना बदलण्यात आली. त्यामुळे आरक्षणात बदल झाला. पूर्वी झालेल्या आरक्षणाप्रमाणे १७ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात एसटी-१, ओबीसी-३ व सर्वसाधारण-५, पुरुष एससी-१, एसटी-१, ओबीसी-२ व सर्वसाधारण-४ याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. रुख्मणबाई सनान्सेउंडणगाव : येथील रुख्मणबाई गोविंदा सनान्से (८०) यांचे सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.