सातपूर बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमामुळे वाहतूक मार्गात बदल
By Admin | Updated: March 21, 2015 00:07 IST2015-03-20T22:40:05+5:302015-03-21T00:07:12+5:30
नाशिक : सालाबादप्रमाणे मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम केला जातो़ शनिवारी (दि़२१) सायंकाळी होणार्या या कार्यक्रमास नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांनी सातपूरगाव ते आयटीआय सिग्नल या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचनाही काढली आहे़

सातपूर बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमामुळे वाहतूक मार्गात बदल
नाशिक : सालाबादप्रमाणे मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम केला जातो़ शनिवारी (दि़२१) सायंकाळी होणार्या या कार्यक्रमास नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांनी सातपूरगाव ते आयटीआय सिग्नल या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचनाही काढली आहे़
शनिवारी (दि़२१) दुपारी दोन वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयटीआय सिग्नल ते सातपूरगाव व सातपूर गाव ते आयटीआय सिग्नल या मार्गावरील दोन्ही बाजूंकडून सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या -जाण्यास बंद करण्यात येणार आहे़ याकाळात वाहनचालकांना आयटीआय सिग्नलकडून एमआयडीसी रोडने परफेक्ट सर्कलमार्गे टापारिया टुल्स कंपनीसमोरून महिंद्रा सर्कलमार्गे सातपूर व त्र्यंबककडे जाता येईल़ तसेच त्र्यंबक व सातपूरकडून नाशिककडे येणार्या वाहनचालकांनीही याच मार्गाचा वापर नाशिककडे येण्यासाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
वाहतुकीचे हे निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच या परिसरात राहणार्या नागरिकांना लागू राहणार नसल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)