चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:05 PM2020-09-07T12:05:38+5:302020-09-07T12:18:26+5:30

चांद्रयान-3 हे मिशन चांद्रयान-2 चं रिपीट मिशन असणार आहे. तसेच यामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.

chandrayaan 3 mission will not have orbiter says union minister | चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

googlenewsNext

नवी दिल्ली - इस्रोने 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान -2 ही महत्वाकांक्षी मोहीम लाँच केली होती. या मोहिमेअंतर्गत प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविण्यात आले. मात्र, 6 सप्टेंबरला सॉफ्ट लँडिंगवेळी  त्यांचा इस्रोशी संपर्क तुटला. यानंतर आता चांद्रयान-3 मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. 2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 लाँच होऊ शकतं अशी माहिती आता समोर आली आहे. जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

चांद्रयान-3 हे मिशन चांद्रयान-2 चं रिपीट मिशन असणार आहे. तसेच यामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये चांद्रयान-2 सारखेच लँडर आणि रोव्हर असे दोन भाग असणार आहेत. ऑर्टिंबर असणार नसल्याची माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाल्यामुळे त्याच्यासोबतचा संपर्क तुटला. 

इस्रोने यानंतर आता आणखी एक मोहीम हाती घेतली असून पुढच्या वर्षी चांद्रयान-3 पाठवणार असल्याची माहिती दिली आहे. चांद्रयान-2 मोहीमेत दक्षिण ध्रूवावर उतरणं नियोजित असतानाही विक्रम लँडरने 7 सप्टेंबरला हार्ड लँडिंग केल्यामुळे भारताला अपयश आलं. अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वे, नासा  आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे. त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे. 


चंद्राचा Digital Map तयार; चांद्रयान मोहिमांसाठी फायदेशीर ठरणार

अमेरिकेततर्फे येत्या 2024 चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी सुद्धा यामुळे आपला चांगलाच उपयोग करता येणार आहे, असे खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास , जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांतमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून मॅप  तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या 51 व्या ल्यूनर प्लॅनेटरी  सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅप ची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिऑलॉजिकल सवेर्चे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी गर्भवतीने स्कूटरवरून केला 1200 किमीचा खडतर प्रवास अन्...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"

माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

Web Title: chandrayaan 3 mission will not have orbiter says union minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.