Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:27 PM2023-08-23T17:27:23+5:302023-08-23T20:31:32+5:30

Chandrayaan 3 Landing Live Updates : चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगसाठी सज्ज झाले होते.

Chandrayaan 3 Landing Live Updates: Historic Moon Landing, World Focuses On India's 'Chandrayaan 3' ISRO, Updates in Marathi | Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी

Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी

googlenewsNext

नवी दिल्ली - 'चंद्रयान ३' चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून जगातील अनेक देश 'इस्रो'च्या अंतराळ मोहिमेवर लक्ष ठेवून होते. अंतराळ संशोधनाच्या इतिहासामध्ये भारतासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरला आहे. चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ अखेर चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आहे. 

LIVE

Get Latest Updates

08:28 PM

चंद्रयान ३ च्या यशानंतर देशात जल्लोषाचं वातावरण

चंद्रयान ३ च्या यशानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण असून अनेक ठिकाणी फटाके, आतषबाजी, मंदिरात पूजा-आरती केली जात आहे. 

08:27 PM

चंद्रयान ३ च्या यशानंतर मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात आरती

08:26 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनल्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार

07:28 PM

चंद्रावर पोहचणारा भारत चौथा देश ठरला, त्याबद्दल अभिनंदन - NASA

"चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन आणि चंद्रावर अंतराळ यानाचे यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन. या मोहिमेत तुमचा भागीदार झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे"-  नासा संचालक बिल नेल्सन

07:26 PM

चंद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल गायक कैलास खेरनं दिल्या शुभेच्छा

07:14 PM

आम्ही आमच्या अपयशातून खूप काही शिकलो अन्...

चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल टीमचं अभिनंदन करताना इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार...आम्ही आमच्या अपयशातून खूप काही शिकलो आणि आज आम्ही यशस्वी झालो. आतापासून चंद्रयान-३ साठी आम्ही पुढील १४ दिवसांची वाट पाहत आहोत.

06:50 PM

मी लवकरच तुमचं कौतुक करण्यासाठी भारतात येईन - मोदी

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून चंद्रयान-३ च्या यशानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले.

06:32 PM

भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला आनंद

06:27 PM

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिलाच देश

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जाणारा आपला भारत पहिला देश ठरला आहे: पी वीरामुथुवेल, चंद्रयान-३ मिशनचे प्रकल्प संचालक

06:16 PM

दिल्ली काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

06:15 PM

भारतासाठी अविस्मरणीय क्षण, पंतप्रधानांनी केले इस्त्रोचे कौतुक

आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकारला... भारत आता चंद्रावर आहे. भारतीय संशोधकांवर देशाला गर्व आहे. भारतासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नवी चेतना देणारा आहे. चंद्रयान महाअभिमानाचे यश भारताच्या उड्डाणाला चंद्राच्या कक्षेच्या पुढे नेणारे आहे. सौरमंडळाच्या सीमांचे सामार्थ्य यातून पडताळले जाणार आहे. आम्ही भविष्यासाठी मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. लवकरच सुर्यावर भारत पोहचेल – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

06:06 PM

भारत चंद्रावर पोहचला, मेहनतीला यश आलं, देशात आनंदोत्सव

05:58 PM

चंद्रयान ३ ने टिपली चंद्राची छायाचित्रे

चंद्रयान-३ लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे शेअर केली आहेत.

05:54 PM

विक्रम लँडर खाली उतरण्यास सुरुवात

ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) आणि पॉवर डिसेंट फेज सुरू झाल्यानंतर चंद्रयान-३ लँडर विक्रमची उंची कमी होत आहे. ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) सुरू केल्यानंतर लँडर मॉड्युलच्या खाली उतरताना कोणताही अडथळा नाही. 

05:49 PM

शरद पवार-सुप्रिया सुळे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे मुंबईतील नेहरू तारांगण येथे चंद्रयान-३ लँडिंग कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणासाठी हजर

05:47 PM

चंद्रयान ३ लँडिंग प्रक्रियेला सुरूवात

चंद्रयान-३ लँडर विक्रमचा पॉवर डिसेंट टप्पा सुरू झाला आहे असे इस्रोने म्हटले आहे

05:43 PM

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये हजर

चंद्रावर चंद्रयान-३ मिशन सॉफ्ट लँडिंगसाठी बेंगळुरू येथील मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ हजर

05:41 PM

चंद्रयान ३ च्या यशासाठी मुस्लिम बांधवांची नमाज

चंद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी श्रीनगरमधील मशिदीत मुस्लीम बांधवांची विशेष नमाज

05:38 PM

कसा झाला चंद्रयान ३ चा प्रवास, इस्त्रोने सांगितले.

चंद्रयान-३ चे प्रक्षेपण आणि लँडिंग दरम्यानच्या प्रवासाचे वर्णन करताना इस्रोने सांगितले की, लँडर मॉड्यूलने २१ वेळा पृथ्वी आणि १२० वेळा चंद्राची प्रदक्षिणा केली आहे.

05:35 PM

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय मंत्री हजर

चंद्रावर विक्रम लँडरचे लँडिंग पाहण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह दिल्लीतील CSIR मुख्यालयात उपस्थित आहेत.

05:34 PM

इस्त्रोच्या मिशन कंट्रोल टीममध्ये सर्व सज्ज

बेंगळुरूमधील इस्रोच्या मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समधून चंद्रयान ३ मिशनच्या लँडिंगसाठी सज्ज 

 

05:30 PM

'चंद्रयान-३'च्या ऑटोमॅटिंक लँडिंग सिक्वेन्ससाठी इस्रो सज्ज

05:29 PM

ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह कव्हरेज, पाहा युट्यूबवर LIVE

संध्याकाळी ६.०४ चा मुहूर्त... विक्रम लँडर चंद्रावर उतरणार, प्रग्यान रोव्हर बाहेर पडणार!... 'इस्रो'च्या यू-ट्युब चॅनलवर चंद्रयान-३ चं लाइव्ह कव्हरेज

Web Title: Chandrayaan 3 Landing Live Updates: Historic Moon Landing, World Focuses On India's 'Chandrayaan 3' ISRO, Updates in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.