शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 06:04 IST

लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता

चंद्रयान ११५ ऑगस्ट : तत्कालीन पंतप्रधान, दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी चंद्रयान कार्यक्रमाची घोषणा केली.२२ ऑक्टोबर २००८ : चंद्रयान-१ ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केले.८ नोव्हेंबर २००८ : चंद्रयान-१ ने चंद्र स्थानांतरण मार्गात प्रवेश केला.१४ नोव्हेंबर २००८ : चंद्रयान-१ ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची पुष्टी केली.२८ ऑगस्ट २००९ : इस्रोने चंद्रयान-१ कार्यक्रम संपल्याची घोषणा केली.

चंद्रयान २२२ जुलै २०१९ : सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-२ प्रक्षेपित करण्यात आले.२० ऑगस्ट २०१९ : चंद्रयान-२ अंतराळयान चंद्राच्या कक्षेत गेले.२ सप्टेंबर २०१९ : चंद्राच्या १०० किलोमीटरच्या ध्रुवीय कक्षेत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालताना विक्रम लँडर वेगळे झाले, मात्र, चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किमी उंचीवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे मोहीम अयशस्वी ठरली.

अपयशी झाले, तरी खूप काही शिकवले 

लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता. या इंजिनांच्या मदतीने लँडरचा वेग कमी करण्यात येणार होता. मात्र याचवेळी लँडरची गती अपेक्षापेक्षा खूप कमी झाली. त्यामुळे सॉफ्टवेअर प्रणालीत बिघाड होऊन लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले. तिसऱ्या मोहिमेत या चुका टाळण्यावर भर देण्यात आला आहे.

प्रमुख लक्ष्य काय? 

पहिले लक्ष्य - ४० दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सुरक्षित लॅण्डिंग करणे

दुसरे लक्ष्य - चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर फिरणे

तिसरे लक्ष्य - रोव्हरकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे चंद्राचे रहस्य उलगडणे

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो