Chandrayaan 2 Mission Why Failure Is The first step towards moon | Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री 
Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री 

नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान-2ला चंद्रावर उतरण्यात अपयश आलं. अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानं इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला थोडा धक्का बसला. मात्र इतिहासातील अंतराळ मोहिमांचा विचार केल्यास आधी अपयश आलेल्या देशांनीच नंतर चांद्रमोहीमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे चांद्रयान-2 मोहिमेतील अपयश इस्रोसाठी यशाची पहिली पायरी ठरू शकतं.

इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेचं अमेरिकेची अंतराळ संस्था नासानंदेखील कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे नासानं आतापर्यंत आखलेल्या 26 चांद्रमोहीमा अपयशी ठरल्या आहेत. तर रशियाला 14 वेळा अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये अपयश आलं आहे. मात्र पुढे याच देशांनी तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणा करत चांद्रमोहीमा यशस्वी केल्या. चांद्रयान-2चं विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयशी ठरलं. हा अनुभव इस्रोला पुढील मोहिमांमध्ये उपयोगी ठरणार आहे. विशेष म्हणजे नासानंदेखील चांद्रयान-2चं कौतुक केलं आहे.

चंद्रावर जाण्याचं स्वप्न 1950 पासून पाहिलं जाऊ लागलं. अमेरिका आणि सोव्हियत युनियननं (रशिया) चंद्रावर जाण्यासाठी 1950 च्या दशकात 14 मोहीमा आखल्या. मात्र यातील बहुतांश मोहीमा अपयशी ठरल्या. चंद्राबद्दलची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेकडून ऑगस्ट 1958 मध्ये पायोनियर नावाची मोहीम राबवली जाणार होती. मात्र प्रक्षेपण करताना काही तांत्रिक दोष समोर आल्यानं ती अपयशी ठरली. यानंतर पुढच्याच महिन्यात सोव्हियत युनियनची पहिली चांद्रमोहीमदेखील प्रक्षेपणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं रद्द करावी लागली.  
 


Web Title: Chandrayaan 2 Mission Why Failure Is The first step towards moon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.