चंद्रशेखर यांचे चिरंजीव भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:55 IST2019-07-17T04:55:25+5:302019-07-17T04:55:42+5:30

नीरज शेखर यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे समाजवादी पक्षालाही रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

Chandrasekhar's chiranjiv in the BJP | चंद्रशेखर यांचे चिरंजीव भाजपमध्ये

चंद्रशेखर यांचे चिरंजीव भाजपमध्ये

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे समाजवादी पक्षालाही रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भूपेंद्र यादव व अनिल जैन या भाजपच्या दोन सरचिटणीसांनी पक्ष मुख्यालयात शेखर यांचे पक्षात स्वागत केले.
शेखर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत होती. अता भाजप त्यांना उत्तर प्रदेशातून पुन्हा राज्यसभेवर पाठविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चंद्रशेखर यांच्या निधनानंतर त्यांच्या बलिया मतदारसंघातून नीरज शेखर लोकसभेवर निवडून येत होते. परंतु सन २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर सपने त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. परंतु बदलते राजकीय वारे पाहून त्यांनी आता भौजपाशी घरोबा केला.

Web Title: Chandrasekhar's chiranjiv in the BJP