शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Chandigarh University: चंडीगड विद्यापीठातील मुलींचे आंघोळ करतानाचे Video लीक, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:57 IST

Chandigarh University Girls Hostel Videos leak: विद्यार्थिनीच आपल्या मैत्रिणींचे आंघोळीचे व्हिडीओ करायची शूट

Chandigarh University Girls Hostel Videos leak: पंजाबच्या मोहालीमध्ये (Mohali) चंडीगड विद्यापीठात एक अतिशय घृणास्पद घटना घडली. विद्यापीठातील महाविद्यालयीन विद्यार्थीनीने आपल्या तब्बल ६० मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या असून त्यातील काही विद्यार्थीनींची प्रकृती गंभीर आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शने केली आणि कारवाईची मागणी केली. याबाबत पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या. तसेच, ट्विटरवर justiceforCUgirls असा हॅशटॅगही ट्रेंड झाला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली असून त्यांनी एक ट्वीट केले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या घृणास्पद कृत्य उघड झाल्यानंतर विद्यार्थींना धक्का बसला. त्यानंतर याबाबत हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. काहींना तो धक्का पचवता न आल्याने तब्बल ८ विद्यार्थिंनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे, तर इतर विद्यार्थिंनीवरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची CM भगवंत मान यांनी गंभीर दखल घेतली. 'चंदीगढ विद्यापीठातील घटनेबाबत ऐकून मला अतिशय दु:ख झाले आहे. आपल्या मुली ही आपला अभिमान आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल', असे ट्वीट मान यांनी केले. तसेच, आपण स्वत: प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या प्रकरणासंबधी अफवांपासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.

नक्की काय घडलं?

चंडीगड युनिव्हर्सिटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. मध्यरात्री जवळपास अडीच वाजता काही विद्यार्थीनी युनिव्हर्सिटीच्या गेटजवळ पोहोचल्या आणि जोरजोरदात घोषणाबाजी करू लागल्या. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत असे. संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाला लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत.

व्हिडीओ रेकॉर्ड करणारी मुलगी सापडली!

युनिव्हर्सिटीच्या गेटवर जाऊन रात्री उशीरा विद्यार्थीनींनी जोरदार हंगामा केला. त्यानंतर आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली. तिनं आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे मान्य केले. तसेच, ती हे व्हिडिओ ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असून हे व्हिडीओ तो वेबसाईट्सवर अपलोड करतो असेही तिने सांगितले. या माहितीनुसार, पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानPoliceपोलिसuniversityविद्यापीठ