शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र सेहवागच्या फरार भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोर्टात हजर केल्यावर जामिनासाठी केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:50 IST

भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागच्या भावाला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे.

Virender Sehwag Brother: भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या अडचणीत सापडला आहे. वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहवाग याला चंदिगड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर सेहवागच्या भावाला चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयात हजर न झाल्याने विनोद सेहवागला फरार घोषित करण्यात आले होते. अटकेनंतर विनोद सेहवागला कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. विनोद सेहवागच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या भावाला चंदीगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. कोर्टाने फरार घोषित केल्यानंतर विनोद सेहवागला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी विनोद सेहवागला कोर्टात हजर केले, जिथे त्याच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. विनोद सेहवागविरुद्ध चंदीगड जिल्हा न्यायालयात ७ कोटी रुपयांचा चेक बाऊन्सचा खटला सुरू आहे. हिमाचलच्या बद्दी येथील श्री नैना प्लॅस्टिक या कंपनीने दिल्लीतील जाल्टा फूड अँड बेव्हरेजेस आणि तिचे तीन संचालक विनोद सेहवाग, विष्णू मित्तल आणि सुधीर मल्होत्रा ​​यांच्या विरोधात हा खटला दाखल केला होता.

गेल्या वर्षी या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने विनोद सेहवागसह तीन संचालकांना आरोपी म्हणून कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र आता त्यांनी कोर्टाच्या समन्सच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. याचिकेत मला आरोपी बनवण्याचा निर्णय चुकीचा होता. मी या कंपनीत संचालक किंवा कर्मचारी नाही. कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात माझी कोणतीही भूमिका नाही, असं विनोद सेहवागने म्हटलं होतं.

श्री नैना प्लास्टिक कंपनीचे वकील विकास सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाल्टा कंपनीने त्यांच्या कंपनीला काही सामान पुरवण्याची ऑर्डर दिली होती. या सामानाची किंमत अंदाजे ७ कोटी रुपये होती. या बदल्यात जाल्टा कंपनीने जून २०१८ मध्ये तक्रारदार कंपनीला एक एक कोटी रुपयांचे सात चेक दिले होते. पण अकाऊंटमध्ये पैसे नसल्याने ते बाऊन्स झाले. तक्रारदार कंपनीने जाल्टा कंपनीला हा सगळा प्रकार सांगितला. दोन महिने उलटूनही चेक क्लिअर न झाल्याने तक्रारदारांनी जाल्टा कंपनी व संचालकांविरुद्ध कायदेशीर नोटीस देऊन पंधरा दिवसांत पैसे देण्याची मागणी केली. कायदेशीर नोटीस देऊनही कंपनीने पैसे दिले नाही तेव्हा तक्रारदारांनी चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला.

याआधी कनिष्ठ न्यायालयाने विनोद सेहवागसह तीन आरोपींना हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र तरीही ते कोर्टात हजर झाले नाहीत. त्यावर न्यायालयाने त्यांचे जामीनपात्र व नंतर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतरही ते कोर्टात न आल्याने त्यांना फरारी घोषित करण्यात आलं. त्यानंतर २२ जुलै २०१९ रोजी विनोद सेहवाग यांनी कोर्टात हजर राहत २ लाख रुपयांच्या जातमचुलक्यावर जामीन घेतला होता.

टॅग्स :virender sehwagविरेंद्र सेहवागPoliceपोलिसCourtन्यायालय