शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

सिद्धूची पाकिस्तानसाठी 'बॅटिंग'; म्हणे, काही लोकांच्या कृत्यासाठी देशाला ठरवू नका दोषी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 5:31 PM

पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं.

चंदीगड- पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं. पुलवाम्यातील या आत्मघातकी हल्ल्यानंतर पंजाब आणि काँग्रेसमधलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी परस्पर विरोधी विधानं केली आहेत. सिद्धू म्हणाले, दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित होणं गरजेचं आहे. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या देशाला दोषी ठरवू शकत नाही. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाकिस्तानबरोबर चर्चा नव्हे, तर कारवाई करण्याची गरज आहे, असं मत अमरिंदर यांनी व्यक्त केली आहे.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानांत मतभिन्नता आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. करतारपूर का बंद करण्यात आलं. करतारपूरशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती भाविक म्हणून येते तेव्हा ती वेगळी असते. तसेच या समस्यांचं मुळापर्यंत जाऊन त्या संपवल्या पाहिजेत, असं मला वाटत असल्याचं सिद्धूनं सांगितलं आहे.सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात 38 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. सर्व राजकीय नेत्यांनीही या भेकड हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे भारतही काही जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण भारत जवानांच्या मागे ठामपणे उभा आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच माजी संरक्षणमंत्री शरद पवार व मुलायम सिंह यादव, योगी आदित्यनाथ यांनीही हल्ल्याचा धिक्कार केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. पण त्यातून पाकला धडा मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता कायमस्वरूपी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली एक घाव घालून पाकचे जे दोन तुकडे केले होते, तशीच कारवाई भारताने करायला हवी, अशीच चर्चा सुरू आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू