शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोविशील्‍ड, कोव्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर कमी होणार? कोविड वर्किंग ग्रुपच्या प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 20:45 IST

सध्या, कोव्हॅक्सीनचा पहिल्या डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस आहे. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोविशील्डसह इतरही काही लसी टोचल्या जात आहेत. भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशील्ड आणि कोव्हॅसीन, तसेच रशियन लस स्पुतनिक-व्ही यांच्या दोन डोसमधील अंतरासंदर्भात गेल्या अनेक दिसांपासून चर्चा सुरू आहे. विशेषत: कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर सरकार कमी करू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, आता, अशी माहिती आली आहे, की या तीनही लसींच्या दोन डोसमधील अंतर बदलले जाणार नाही. (Chairman of the Covid-19 Working Group n k arora says no proposal for change in dose interval of covishield covaxin and sputnik v)

कोविड-19 वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन के अरोरा यांनी यासंदर्भात सांगितले, की नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इम्‍यूनायझेशन (NTAGI) सातत्याने या लसींच्या प्रभावासंदर्भातील आकड्यांची समीक्षा करत आहे. सध्या एनटीएजीआयकडून कोविशील्‍ड, कोव्हॅक्‍सीन आणि स्‍पुतनिक-V या तिन्ही लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यासंदर्भात अथवा कमी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही.

सध्या, कोव्हॅक्सीनचा पहिल्या डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस आहे. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तसेच, रशियाच्या स्पुतनिक-व्ही, जी आता भारतातही तयार होत आहे, त्याच्या डोसमधील अंतरातही कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार