भयंकर! 22 वर्षीय तरुणाला तब्बल 8 वर्षे झाडाला ठेवलं बांधून; धक्कादायक कारण आलं समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 14:30 IST2022-05-27T14:29:30+5:302022-05-27T14:30:57+5:30

गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात असाच एक प्रकास उघडकीस आला आहे. 22 वर्षीय मुलाला गेल्या आठ वर्षांपासून झाडाला बांधून ठेवण्यात आले होते.

chained to tree for 8 years 22 year old mahesh to break free | भयंकर! 22 वर्षीय तरुणाला तब्बल 8 वर्षे झाडाला ठेवलं बांधून; धक्कादायक कारण आलं समोर 

फोटो - NBT

नवी दिल्ली - उन्हाळा, पावसाळा असो किंवा थंडी अशा वातावरणात जर एखाद्या व्यक्तीला तब्बल आठ वर्ष एकाच झाडाला बांधून ठेवल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं. तर तुम्हाला मोठा धक्काच बसेल. त्याची काय अवस्था होईल?, ही कल्पना करुनच आपल्या अंगावर काटा येतो. पण अशी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात असाच एक प्रकास उघडकीस आला आहे. 22 वर्षीय मुलाला गेल्या आठ वर्षांपासून झाडाला बांधून ठेवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून आठ वर्षांपूर्वी तो अचानक आक्रमक झाला. त्याने दुसऱ्यांवर हल्ला, दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याच्या या रोजच्या त्रासाला पालक आणि शेजारचे देखील कंटाळले होते. त्यातच घरच्या गरिबीमुळे महेशवर उपचारही होत नव्हते. त्यामुळं महेशच्या कुटुंबीयांनी त्याला नग्नावस्थेत झाडाला बांधून ठेवलं.

महेशचे वडिल प्रागजी ओलकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा मानसिक रुग्ण आहे. त्यामुळे तो अचानक आक्रमक होतो. त्याच्याजवळ कोणी गेल्यास तो त्यांच्यावर दगड फेकायचा. तसेच, घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांच्यावर उपचार करणं आम्हाला शक्य नाही. म्हणून महेशला एका झाडाला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवले होतं.

सोशल मीडियावरील कॉमेडिअन नितीन जानी याला अलीकडेच या परिवाराच्या परिस्थितीबाबत माहिती मिळाली. त्यावर लगेचच त्यांनी या कटुंबाच्या मदतीसाठी धाव घेतली. गावाच्या बाहेर या कुटुंबाला घर बांधून देण्यात आले. तिथे वीज व पंख्यांची व्यवस्थाही करण्यात आली. तसेच महेशला सोडवून त्याला जेवणही देण्यात आले. येत्या दोन तीन दिवसांत महेशला उपचारांसाठी मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्यात येईल, अशी माहिती नितीन जानी यांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: chained to tree for 8 years 22 year old mahesh to break free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात