शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: मोदी सरकार चीनला मोठा धक्का देणार?; ११७२ वस्तूंची नवी यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 12:10 IST

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांवरील हल्ल्यानंतर चीनविरोधात संतापाची लाट

ठळक मुद्देडीपीआयआयटीकडून 'मेड इन चायना' वस्तूंची यादी तयारचीनमधून होणारी आयात रोखण्यासाठी मोदी सरकारचं पाऊलनव्या यादीत १,१७२ वस्तूंचा समावेश; चीनला आणखी एक धक्का देण्याची तयारी

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात लडाखच्या गलवानमध्ये झालेल्या हिंसक झटापटामुळे भारत आणि चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट असून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं 'मेड इन चायना' वस्तूंची यादी तयार केली आहे.अतिशय स्वस्त वस्तूंची यादी पूर्ण झाल्यानंतर आता मोदी सरकारनं चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली आहे. यामध्ये बॅटरी, मोटारींचे सुटे भाग, इलेक्ट्रिक यंत्रसामग्रीसह औद्योगिक यंत्रांचा समावेश आहे. मोदी सरकारनं तयार केलेल्या यादीचा फटका चीनमधून होणाऱ्या टोस्टर्ससारख्या उपकरणांच्या आयातीला बसणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं (डीपीआयआयटी) तयार केलेल्या दुसऱ्या यादीत चीनमधून आयात होणाऱ्या १,१७२ वस्तूंचा समावेश असल्याचं वृत्त सीएनबीसी-टीव्ही १८नं दिलं आहे.डीपीआयआयटीनं तयार केलेल्या यादीत टोस्टर्स, फ्रीज, एसी, कॉफी मेकर्स, मायक्रोव्हेव ओव्हन, शेवर्स, कटलरी, शिलाई मशीनचा समावेश आहे. याशिवाय अनेक इलेक्ट्रिक उपकरणांवर अधिकचा आयात कर लावण्याचा डीपीआयआयटीचा विचार आहे. यामध्ये  सर्किट ब्रेकर्स, उच्च क्षमतेचे स्विच, रेसिस्टर्स, जनरेटर्स आणि डीसी मोटर्सचा समावेश आहे. या यादीमध्ये इलिव्हेटर्स, रोलर बेअरिंग्ज, व्हॉल्व्स, खाद्य प्रक्रिया करणारी यंत्रं आणि कोळसा हाताळणाऱ्या यंत्रांचा समावेश आहे.१५ जूनच्या रात्री लडाखमधील गलवान भागात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले. त्यावेळी हिंसक झटापट झाली. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली आहे. चीनमधून होणारी आयात थांबवण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. चीनमधून दरवर्षी ७४ बिलीयन अमेरिकन डॉलरचं सामान भारतात येतं. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत