शहरं
Join us  
Trending Stories
1
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
4
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
5
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
8
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
9
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
10
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
11
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
12
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
13
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
14
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
15
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
16
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
17
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
18
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
19
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
20
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीवर उत्तम उपचार, केंद्राकडून थाप; देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:40 IST

राज्य एड्स नियंत्रण संस्थेला केंद्र शासनाचा पुरस्कार 

मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नाको) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला (एमसॅक) विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या काळजी आधार आणि उपचार विभागाच्या प्रमुख डॉ. चिन्मयी दास यांच्या हस्ते तो महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी, काळजी आधार आणि उपचार विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रियांका वाघेला आणि सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.

अँटी रेट्रोव्हायरल वर भरहा सन्मान  एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार सेवा पुरवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला अधोरेखित करतो.  आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक सुनील भोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि डॉ. भवानी मुरुगेसन यांनी सांगितले, हा पुरस्कार एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी विनामूल्य आधार पुरवण्याच्या राज्याच्या कटिबद्धता अधोरेखित करतो.

महाराष्ट्र अव्वलचनाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार ‘ग्रीन झोन’ मध्ये सर्वाधिक अँटी-रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने आपले अव्वल स्थान मिळविले आहे. या केंद्रांनी अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामध्ये नोंदणीकृत सर्व एचआयव्ही - पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सर्वसमावेशक थेरपी उपचार सुनिश्चित करणे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आधार या गोष्टींचा समावेश आहे.

पाच एआरटी सेंटर सर्वोत्कृष्ट सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ हून अधिक गुण मिळवलेल्या ‘ग्रीन झोन’मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, एएफएमसी पुणे, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर आणि ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय धाराशिव या सर्वोत्कृष्ट ५ एआरटी केंद्रांचा सत्कार करण्यात आला.

खासगी सेंटरही आघाडीवरकाशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय पुणे, आणि लोटस मेडिकल फाउंडेशन, कोल्हापूर या खासगी वैद्यकीय संस्थांमधील दोन एआरटी केंद्रांचा ‘ग्रीन झोन’मध्ये राहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Honored as Best State for HIV Treatment by Central Government

Web Summary : Maharashtra received an award as the best state for providing care and treatment services to HIV patients. The state's commitment to providing free support and excellent performance in anti-retroviral therapy earned this recognition. Several ART centers were also recognized for their outstanding services.
टॅग्स :HIV-AIDSएड्स