शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्स पुरुषाचे स्त्री बीज सुरक्षित ठेवण्यास केंद्राचा विरोध; एआरटी ॲक्ट लागू नसल्याचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:36 IST

Central Government: कायदा ट्रान्सजेंडरला आपले स्त्री बीज जतन करून ठेवण्याची परवानगी देत नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: ट्रान्सजेंडर व्यक्तींना सहायक प्रजनन तंत्रज्ञान (असिस्टेड रिप्राॅडक्शन टेक्नॅालाॅजी (एआरटी) ॲक्ट लागू होत नाही. कायदा ट्रान्सजेंडरला आपले स्त्री बीज जतन करून ठेवण्याची परवानगी देत नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

२८ वर्षीय ट्रान्सजेंडर हरी देवगीथ जन्मली तेव्हा मुलगी होती. नंतर तिने शस्त्रक्रिया करून घेऊन पुरुष म्हणूनच राहायचे ठरवले. २०२३ मध्ये तिचे स्तन काढण्यात आले. पुढच्या टप्प्यात गर्भाशय व अंडाशय काढण्याचे नियोजन होते. या शस्त्रक्रियेपूर्वी आपले स्त्री बीज गोठवून जतन करण्याची परवानगी मिळावी म्हणजे भविष्यात जैविक पालकत्वाचा पर्याय उपलब्ध राहील म्हणून त्यांनी केरळ हायकोर्टात अर्ज केला. याला मनाई करणे संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत त्यांच्या प्रजनन स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.  

... हा वैध पर्याय

ट्रान्सजेंडर गर्भधारणा करू शकतात, त्यामुळे त्यांचे स्त्री बीज जतन करणे हा वैध प्रजनन पर्याय आहे. ही सुविधा नाकारणे ट्रान्सजेंडर संरक्षण कायद्याने दिलेल्या आरोग्याचा हक्क आणि भेदभावविरोधी नियमांचे उल्लंघन ठरते असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, याला केंद्र सरकारने जोरदार विरोध केला आहे.

केंद्राने कोणते मुद्दे मांडले?

कायदा फक्त विवाहित पुरुष-स्त्री जोडपे किंवा अविवाहित स्त्रीला एआरटी प्रक्रियेची परवानगी देतो. ट्रान्सजेंडर किंवा अविवाहित पुरुषांना या व्याख्येत स्थान नाही. गर्भाशय व अंडाशय काढण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर जतन केलेले स्त्री बीज याचिकाकर्ता स्वतः वापरू शकणार नाही. याचा एकमेव उपयोग सरोगसीसाठी म्हणजेच त्रयस्थ स्त्रीच्या गर्भात बाळ वाढवून जन्माला घालण्यासाठी राहील. सरोगसी कायदा ट्रान्सजेंडर व्यक्तींना सरोगसीची परवानगी देत नाही. देशातील दत्तक कायदे आणि बाल न्याय अधिनियमात ट्रान्सजेंडरना दत्तक पालक म्हणून मान्यता नाही. ही बाब न्यायालयीन व्याख्येची नसून धोरण निर्मितीची आहे. एआरटी कायद्याचा विस्तार विधिमंडळानेच करणे आवश्यक आहे, न्यायालयाने नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Center Opposes Preserving Transgender Woman's Eggs; Cites ART Act Inapplicability

Web Summary : The central government opposes allowing a transgender woman to preserve her eggs, arguing the ART Act doesn't apply. The Act only permits married couples or single women ART procedures, excluding transgender individuals. Surrogacy and adoption laws also restrict transgender parenthood, making egg preservation legally complex.
टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरCentral Governmentकेंद्र सरकार