शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निवडणुकीला 100 दिवस शिल्लक असताना सवर्ण आठवले; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 21:22 IST

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणाऱ्या विधेयकावरून काँग्रेसची टीका

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय आज मोदी सरकारनं घेतला. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदी सरकावर शरसंधान साधलं. लोकसभा निवडणुकीला 100 दिवस शिल्लक राहिले असताना मोदींना आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांची आठवण झाली. नोकऱ्याच नसताना त्या आरक्षणाचा उपयोग काय, असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारला. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं. 'आम्ही अशा निर्णयाचं स्वागतच करू. मात्र मोदीजी नोकऱ्या आहेत कुठे? नोकऱ्या नसताना देण्यात आलेल्या आरक्षणाचा काय उपयोग?,' असा प्रश्न विचारत सरकारला निवडणुकीआधी सवर्णांची आठवण झाली, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला. नोकऱ्या नसताना घेण्यात आलेला आरक्षणाचा निर्णय म्हणजे निव्वळ घोषणाच असेल, असंदेखील ते म्हणाले. भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे जुमला असल्याचं सिन्हा म्हणाले. 'अशा पद्धतीचं आरक्षण देण्यात अनेक तांत्रिक आणि घटनात्मक अडथळे आहेत. याबद्दलचं विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे या प्रकरणात सरकार लवकरच तोंडघशी पडेल,' असं सिन्हा म्हणाले. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक मोदी सरकारकडून उद्याच लोकसभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून हे विधेयक उद्याच लोकसभेत मांडण्यात येईल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सरकार अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंदेखील आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीreservationआरक्षणcongressकाँग्रेसParliamentसंसदBJPभाजपा