शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आपच्या विदेशी निधीत कायद्याचे उल्लंघन नाही केंद्र सरकार : उच्च न्यायालयात माहिती

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला(आप)विदेशातून मिळालेल्या देणग्यांची सखोल तपासणी करण्यात आली असून यात कुठलीही अनियमितता अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळले नाही, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला(आप)विदेशातून मिळालेल्या देणग्यांची सखोल तपासणी करण्यात आली असून यात कुठलीही अनियमितता अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळले नाही, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली.
मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायमूर्ती राजीव सहाय एंडलॉ यांच्या खंडपीठाने गृहमंत्रालयाला यासंबंधीचा आपला ताजा अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे एक वकील मनोहरलाल शर्मा यांच्या जनहित याचिकेवरील आपला निर्णय न्यायालयाने राखून ठेवला. आपला मिळणाऱ्या विदेशी देणग्यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती शर्मा यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आपच्यावतीने बाजू मांडणारे ॲड. प्रणव सचदेव यांनी सांगितले की, विदेशी निधी स्वीकारताना पक्षाने कुठल्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. ३० कोटी रुपयांची देणगी फक्त भारतीय नागरिकांकडूनच प्राप्त झाली असून यापैकी फक्त साडेआठ कोटी रुपये अनिवासी भारतीयांनी दिले आहेत. पक्षावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाने माफी मागावी -आप
दरम्यान, विदेशी देणग्याप्रकरणी आपकडून कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याची माहिती केंद्रातर्फे न्यायालयात देण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने याप्रकरणी केलेल्या आरोपांबद्दल क्षमा मागावी, अशी मागणी आपने केली आहे.
(वृत्तसंस्था)