खोट्या बातम्या देणाऱ्यांना सरकारचा 'दे धक्का', २ कोटी सबस्क्रायबर्स असलेले ८ चॅनेल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 03:10 PM2023-08-09T15:10:52+5:302023-08-09T15:11:21+5:30

Fake News : खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे.

central government has taken action and blocked eight YouTube channels for spreading fake news | खोट्या बातम्या देणाऱ्यांना सरकारचा 'दे धक्का', २ कोटी सबस्क्रायबर्स असलेले ८ चॅनेल बंद

खोट्या बातम्या देणाऱ्यांना सरकारचा 'दे धक्का', २ कोटी सबस्क्रायबर्स असलेले ८ चॅनेल बंद

googlenewsNext

नवी दिल्ली : खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. समाजात द्वेष पसवण्यासाठी कार्यरत असलेल्या आठ यूट्यूब चॅनेलला सरकारने मोठा धक्का दिला असून त्यांना ब्लॉक केले आहे. लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी घेणे आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) बंदी यांसारख्या खोट्या बातम्या पसरवण्यात या वाहिन्यांचा मोठा सहभाग आढळून आला होता. याचीच दखल घेत सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. 

कारवाई करण्यात आलेल्यांपैकी अनेकांवर देशाच्या लष्कराबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप देखील आहे. संबंधित यूट्यूब चॅनेलचे व्हिडीओ तपासले असता या वाहिन्यांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या वाहिन्यांवरील बनावट बातम्यांची सत्यता तपासली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलचे दोन कोटींहून अधिक सदस्य अर्थात सबस्क्रायबर्स आहेत. 
 
कारवाई करण्यात आलेले चॅनेल्स -

  1. यहां सच देखो (Yahan Sach Dekho)
  2. कॅपिटल टिव्ही (Capital TV)
  3. केपीएस न्यूज (KPS News)
  4. सरकारी व्लॉग (Sarkari Vlog)
  5. अर्न टेक इंडिया (Earn Tech India)
  6. एसपीएन9 न्यूज (SPN9 News)
  7. एज्युकेशनल दोस्त (Educational Dost)
  8. वर्ल्ड बेस्ट न्यूज (World Best News)

दरम्यान, खोट्या बातम्या पसरवून दिशाभूल करणाऱ्या चॅनेल्सबाबत सरकार खूप सतर्क झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाकडून सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तरुण, विद्यार्थी, समाज आणि समाजाची दिशाभूल करणारा आणि भडकावणारा मजकूर देणार्‍या बातम्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी देखील सरकारने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनेल्सवर कडक कारवाई केली आहे.

Web Title: central government has taken action and blocked eight YouTube channels for spreading fake news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.