भ्रष्ट कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिली सक्तीची सेवानिवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 23:52 IST2019-12-05T23:52:08+5:302019-12-05T23:52:21+5:30

भ्रष्टाचार, लाचलुचपत, अकार्यक्षमता आणि कामाविषयी सचोटी वा दक्षता नसणे या कारणास्तव कर्मचा-यांना सक्तीने निवृत्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत.

Central government gives forced retirement to corrupt employees | भ्रष्ट कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिली सक्तीची सेवानिवृत्ती

भ्रष्ट कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिली सक्तीची सेवानिवृत्ती

नवी दिल्ली : भ्रष्टाचार व लाचलुचपतीच्या कारणास्तव गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या २२0 कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या सेवेतील ९६ वरिष्ठ अधिकाºयांचाही समावेश आहे.
कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे की, जुलै २0१४ ते आॅक्टोबर २0१९ या काळात ज्यांना सक्तीने निवृत्त करण्यात आले, त्यात अ वर्गातील ९६ अधिकारी असून, १२६ ज ब वर्गातील आहेत. भ्रष्टाचार, लाचलुचपत, अकार्यक्षमता आणि कामाविषयी सचोटी वा दक्षता नसणे या कारणास्तव कर्मचाºयांना सक्तीने निवृत्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Central government gives forced retirement to corrupt employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.