शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 06:17 IST

Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे मातरम मोहीम राबविली होती. अगदी त्याच धर्तीवर अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी आमचे प्रयत्न जारी आहेत, असेही ते म्हणाले.अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी सत्ता काबीज केली असून, त्यामुळे तिथे राहणारे विविध देशांतील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत जायचे आहे. केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे शिंदे यांनी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेस केंद्र सरकारने १३ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. मात्र गेल्या रविवारी विमान अफगाणिस्तानातील भारतीयांना घेऊन उड्डाण करणार होते, त्याच्या आधीच काबूल विमानतळावर गोळीबार झाला. त्यामुळे धोक्याची सूचना मिळाल्यामुळे हे उड्डाण त्यावेळी होऊ शकले नव्हते. तसेच काबूलची हवाई हद्दही त्यावेळी बंद करण्यात आली होती. 

एस. जयशंकर यांची गुटेरस यांच्याशी चर्चाअफगाणिस्तानातील स्थितीसंदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस व अन्य अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता बळकावली.  त्यामुळे त्या देशात गोंधळ माजला आहे,त्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान