केंद्र सरकारचे वतीन कांदा बियाणे निर्यातबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:31 IST2020-10-29T21:04:49+5:302020-10-30T01:31:44+5:30
लासलगाव : कांदा निर्यात बंदी, कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंध त्यानंतर कांदा आयातीला सुट यानंतर आज केंद्र सरकारने नोटीफिकेशन नंबर 49/2015-20 हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संचलक अमित यादव यांच्या सहीने नोटीफिकेशन जारी करून परत कांदा बियाणे निर्यातीला देखील बंदी जाहीर केली आहे.

केंद्र सरकारचे वतीन कांदा बियाणे निर्यातबंदी
लासलगाव : कांदा निर्यात बंदी, कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंध त्यानंतर कांदा आयातीला सुट यानंतर आज केंद्र सरकारने नोटीफिकेशन नंबर 49/2015-20 हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संचलक अमित यादव यांच्या सहीने नोटीफिकेशन जारी करून परत कांदा बियाणे निर्यातीला देखील बंदी जाहीर केली आहे.
सरकारने कांदा निर्यात बंदी व कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधामुळे देशभरात तीव्र विरोध टिका झाली.त्यामुळे आता कांदा उत्पादकांच्या रोषाचा पारा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा बियाणे निर्यातीवर निर्बंध आले असले तरी जादा दराने कांदा बियाणे विक्री होते या शेतकरी वर्गाचे तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही
14 सप्टेंबर 2020 रोजी केंद्र सरकारने नोटीफिकेशन नंबर 31/2015-20 हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संचलक अमित यादव यांच्या सहीने नोटीफिकेशन जारी करून परत निर्यातबंदी जाहीर केली आहे.