शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

CBSE 10th Result 2018: सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, देशभरात मुलींचीच बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 1:43 PM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून 16.88 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.  

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून यावर्षी एकूण 16 लाख 24 हजार 682 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 8 हजार 594 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

यंदा सीबीएसई दहावीचा एकूण निकाल 86.70 टक्के लागला आहे. या परीक्षेत प्रखर मित्तल, रिमझिम अग्रवाल, नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी या विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरात 88.67 % मुली  उत्तीर्ण झाल्या आहेत तर 85.32 टक्के मुलं देशात उत्तीर्ण झाली आहेत. म्हणजेच यंदा या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 

विभागनुसार, तिरुवनंतपूरममध्ये सर्वाधिक 99.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल चेन्नई विभागाने 97.37 टक्के आणि अजमेर विभागाने 91.86 टक्के अशी बाजी मारली आहे. 

यंदाच्या वर्षी एकूण 16 लाख 24 हजार 682 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या 2018च्या (दहावी आणि बारावीच्या संयुक्त) परीक्षेला जगभरातून 28 लाख विद्यार्थी बसले होते. सीबीएसई दहावीचा निकाल  cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे दहावी आणि बारावीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील दहावीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.

टॅग्स :CBSE 10th Result 2018सीबीएसई दहावी परीक्षा निकाल २०१८educationशैक्षणिकCBSE Examसीबीएसई परीक्षा