आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 13:51 IST2018-07-26T13:40:26+5:302018-07-26T13:51:55+5:30
आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार असल्याचे सुत्राकडून समजतेय.

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार
मुंबई - सर्व जातींना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारचं खलबते सुरू झाली आहेत. नवी दिल्लीमध्ये यावर सध्या बैठक सुरु झाली आहे. सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्या प्राथमिक चर्चा सुरु असून विस्तृत चर्चेनंतर निर्णय होणार आहे.
आरक्षण हा समतेच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे. ते घटनेच्या कलम 14,15,16,17,19,21,25 ते30, 243,326,330 ते 342 मध्ये येते. काळानुरूप गरज पडल्यास संसदेला राज्यघटनेत दुरुस्ती करता येते. भारतीय संविधानाच्या कलम ३६८ द्वारे ही घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. विधेयक एकूण सदस्यांच्या बहुमताने किंवा सदनात त्यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी दोन तृतीयांशपेक्षा कमी नाहीत, अशा संख्येने मंजूर करता येते. त्याला राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. याशिवाय राज्यांशी संबंधित अशा काही कलमांच्या घटना दुरुस्तीला किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची मान्यताही घ्यावी लागते. त्यामुळेच आवश्यकतेनुसार आजपर्यंत १२३ वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षीपासून मराठा समाजाने 58 पेक्षा जास्त मोर्चे काढत आरक्षणाची मागणी केली आहे. दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने हिंसक वळण घतेले आहे. बऱ्याच ठिकाणी तोडफोड-जाळपोळीच्या घटना घडल्या आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.