CoronaVirus News: कोरोना चाचणीचे शुल्क आणखी कमी करण्याचा केंद्राचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:34 AM2020-05-27T00:34:34+5:302020-05-27T06:44:38+5:30

मार्चमध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे पुरेसे संच देशात उपलब्ध नव्हते.

 The center plans to further reduce corona test fees | CoronaVirus News: कोरोना चाचणीचे शुल्क आणखी कमी करण्याचा केंद्राचा विचार

CoronaVirus News: कोरोना चाचणीचे शुल्क आणखी कमी करण्याचा केंद्राचा विचार

Next

नवी दिल्ली : कोरोनाच्या चाचणीसाठी ४५०० रुपये इतकेच शुल्क आकारण्यात यावे, असा नियम केंद्र सरकारने केला असून तो खासगी प्रयोगशाळांसाठी बंधनकारक आहे. हे शुल्क आणखी कमी करावे, असे केंद्र सरकारने राज्यांना कळविले आहे.

मार्चमध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे पुरेसे संच देशात उपलब्ध नव्हते. तसेच हे संच विदेशातून आणावे लागायचे. आता स्वदेशात बनविलेले कोरोनाचे चाचणी संच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या चाचणीवर होणारा खर्च कमी झाला आहे. त्यामुळेच चाचणी शुल्कात कपात करण्याचा केंद्राचा विचार आहे.

Web Title:  The center plans to further reduce corona test fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.