शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा जिवंत होते CDS बिपिन रावत, रुग्णालयात जाताना काय म्हणाले? बचावकर्त्यानं सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 09:42 IST

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते.

नवी दिल्ली/उदगमंडलम - हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे अपघातानंतरही जिवंत होते. अपघातानंतर Mi-17V5 हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढताना त्यानी हिंदीत आपले नावही सांगितले. बचाव पथकातील एका सदस्याने ही माहिती दिली आहे. जनरल रावत यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीलाही बाहेर काढण्यात आले. नंतर त्याची ओळख ग्रुप कॅप्टन वरुण सिंह, अशी झाली. ग्रुप कॅप्टन हे अपघातात बचावलेले एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हळू आवाजात सांगितलं नाव -अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते. मुरली म्हणाले, आम्ही त्यांना बाहेर काढताच ते संरक्षण कर्मचाऱ्यांशी अत्यंत हळू आवाजात हिंदीतून बोलले आणि त्यांचे नाव सांगितले. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मुरली यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांना तत्काळ दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. ज्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

चादरीत गुंढाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात -मुरली म्हणाले, "जनरल रावत यांनी सांगितले, की त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाळा गंभीर इजा झाली आहे. यानंतर त्यांना चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले." यावेळी, परिसरात बचाव कार्यादरम्यान बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. येथे आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे वाहन नेण्यासही मार्ग नव्हता. मुरली म्हणाले, आम्हाला जवळची नदी आणि घरांमधून भांड्याने पाणी आणावे लागले. ऑपरेशन खूप कठीण होते, कारण आम्हाला लोकांना वाचवण्यासाठी अथवा मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचे टोकदार तुकडे आधी बाजूला करावे लागले. 

बचाव कार्यात तुटलेल्या झाडाचा अडथळा -  मुरली म्हणाले, बचावकार्यात एका तुटलेल्या झाडाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. ते कापावे लागले. या सर्वांमुळे आमच्या बचाव कार्याला विलंब झाला. आम्ही 12 मृतदेह बाहेर काढले. तर दोघांना जिवंत बाहेर काढले. हे दोघेही गंभीर रित्या भाजले होते. नंतर भारतीय हवाई दलाचे जवान अर्ध्या रस्त्यात बचाव कार्यात सहभागी झाले. त्यांनी टीमला घटना स्थळी नेले.  अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठां फायरमनने सांगितले, की ढिगाऱ्यांत शस्त्रेही पडलेली होती. यामुळे आम्हाला सावधगिरीने काम करावे लागले.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतFire Brigadeअग्निशमन दलairforceहवाईदलIndian Armyभारतीय जवानAccidentअपघात