CBSE Board Exams Updates: मोठा निर्णय! CBSE कडून दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 02:12 PM2021-04-14T14:12:59+5:302021-04-14T14:31:34+5:30

CBSE Board Exams Updates Class 10th Board Exams Canceled 12th Postponed: कोरोनाचा कहर वाढल्यानं मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

CBSE Board Exams Updates Class 10th Board Exams Canceled 12th Postponed | CBSE Board Exams Updates: मोठा निर्णय! CBSE कडून दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

CBSE Board Exams Updates: मोठा निर्णय! CBSE कडून दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा वाढता कहर पाहता मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईं (CBSE) दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिक्षण मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (CBSE Board Exams Updates Class 10th Board Exams Canceled 12th Postponed)




४ मे ते १४ जून या कालावधीत सीबीएसईकडून दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र त्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऑब्जेक्टिव्ह निकषांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील आणि त्यांना गुणपत्रिका दिल्या जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले जातील. एखादा विद्यार्थी याबद्दल समाधानी नसल्यास त्याला परीक्षा देण्याची संधी मिळेल.




१२ वीच्या परीक्षादेखील ४ मे ते १४ जून याच कालावधीत होणार होती. मात्र देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता ती स्थगित करण्यात आली आहे. १ जूनला आणखी एक बैठक होईल. त्यात त्यावेळच्या स्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल. परीक्षा होणार असल्यास त्याबद्दलची सूचना विद्यार्थ्यांना १५ दिवस आधी दिली जाईल.

Read in English

Web Title: CBSE Board Exams Updates Class 10th Board Exams Canceled 12th Postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.