CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:59 IST2025-05-13T11:56:58+5:302025-05-13T12:59:10+5:30
CBSE Board 12th Result 2025 Out: सीबीएसई १२ वीची १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
आज महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर झाला. याचबरोबर आज सीबीएसई बोर्डाने देखील १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएससीच्या १२ वीचा निकाल 88.39% लागला आहे. विद्यार्थी, पालक हा निकाल cbse.gov.in, results.cbse.nic.in वर जाऊन पाहू शकतात.
सीबीएसई १२ वीची १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.४१% ने वाढले. तर मुलींनी मुलांपेक्षा ५.९४% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे. ९१% पेक्षा जास्त मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पुणे विभागाचा ९०.९३ टक्के निकाल लागला आहे.
सीबीएसई बोर्ड कोणतीही मेरीट लिस्ट जारी करत नाही, तसेच टॉपर कोण याचीही घोषणा करत नाही. तसेच सर्व शैक्षणिक संस्थांनाही कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत किंवा जिल्ह्यात ट़ॉपर घोषित करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हे निकाल डिजिलॉकर, उमंग ॲप, आणि एसएमएसद्वारेही पाहता येणार आहेत.
विभागनिहाय उत्तीर्णता% -२०२५ प्रदेश (पूर्ण विषय)
विभागाचे नाव - उत्तीर्ण %
विजयवाडा - ९९.६०
त्रिवेंद्रम - ९९.३२
चेन्नई - ९७.३९
बेंगळुरू - ९५.९५
दिल्ली पश्चिम - ९५.३७
दिल्ली पूर्व - ९५.०६
चंदीगड - ९१.६१
पंचकुला - ९१.१७
पुणे - ९०.९३
अजमेर - 90.40
भुवनेश्वर - ८३.६४
गुवाहाटी - ८३.६२
डेहराडून - ८३.४५
पाटणा - ८२.८६
भोपाळ - ८२.४६
नोएडा - ८१.२९
प्रयागराज - ७९.५३
महाराष्ट्र एचएससीचा निकाल काय...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल गेल्याच आठवड्यात जाहीर केला होता.राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षापेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेज प्रवेशांना सुरुवात होणार...
या दोन्ही निकालांनंतर आता लगेचच पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे. पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे.