सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; तब्बल 13 विद्यार्थ्यांना 99.80 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:06 PM2019-05-06T15:06:17+5:302019-05-06T16:15:49+5:30

तब्बल 99.85 टक्क्यांसह त्रिवेंद्रम विभाग देशात पहिला

CBSE 10th Class Result 2019 Declared Overall pass percentage rises to 91 1 from 86 07 last year | सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; तब्बल 13 विद्यार्थ्यांना 99.80 टक्के

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; तब्बल 13 विद्यार्थ्यांना 99.80 टक्के

googlenewsNext

नवी दिल्ली: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण जवळपास पाच टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या वर्षी 86.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हे प्रमाण 91.1 टक्क्यांवर गेलं आहे. यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल आयसीएसई आणि अनेक राज्यांच्या बोर्डांआधी लागला आहे. 




सीबीएसई बोर्डाच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. या विभागाचा निकाल तब्बल 99.85 टक्के इतका लागला आहे. तर 99 टक्क्यांसह चेन्नई दुसऱ्या, 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत तब्बल 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेला जवळपास 18 लाख विद्यार्थी बसले होते. 




गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सीबीएसईच्या दहावीचा निकाल फार लवकर जाहीर झाला आहे. यंदा अवघ्या 38 दिवसांत निकाल जाहीर झाला आहे. यंदा सीबीएसईच्या बारावीचा निकालदेखील अतिशय कमी दिवसात जाहीर झाला होता. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 55 दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. 

Web Title: CBSE 10th Class Result 2019 Declared Overall pass percentage rises to 91 1 from 86 07 last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.