शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 5:57 AM

खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोपावरून अटक केलेले उपअधीक्षक देवेंद्र कुमार दिल्ली उच्च न्यायालयात गेल्याने ‘सीबीआय’मधील वरिष्ठांचे अंतर्गत भांडण रंगण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना व याच प्रकरणात खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोपावरून अटक केलेले उपअधीक्षक देवेंद्र कुमार दिल्ली उच्च न्यायालयात गेल्याने ‘सीबीआय’मधील वरिष्ठांचे अंतर्गत भांडण रंगण्याची चिन्हे आहेत. त्यातच अस्थाना यांच्या मुलीच्या लग्नाचे प्रकरणही सीबीआयने उकरून काढले असून, त्यामुळे त्यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत.अस्थाना व कुमार या  दोघांनीही त्यांच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी स्वतंत्र याचिका केल्या. न्या. नझमी वझिरी यांच्यापुढे त्या सुनावणीसाठी आल्या. अस्थाना प्रकरणात आपल्याला सविस्तर अभ्यास सरावा लागेल, असे सांगून प्न्या. वझिरी यांनी सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी ठेवली. तोपर्यंत अस्थाना यांच्यावरील गुन्ह्याच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी, असे निर्देश दिले.कुमार यांना अटक झालीच असल्याने त्यांच्या याचिकेवर कोणताही अंतरिम आदेश दिला गेला नाही. मात्र ‘सीबीआय’ व संचालक आलोक वर्मा यांना नोटिस काढून पुढील सुनावणीपूर्वी उत्तर देण्यास सांगण्यात आले. पूर्वी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये ‘सीबीआय’कडून काम पाहणारे ज्येष्ठ वकील अमरेंद्र सरन अस्थाना यांचे वकील आहेत.कुरेशीच्या तपासासाठी नेमलेल्या ‘एसआयटी’चे अस्थाना प्रमुख व कुमार हे तपास अधिकारी आहेत. वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांना पाठबळ मिळावे म्हणून कुमार यांनी सतीश बाबू साना या व्यापाऱ्याची आधीची जबानी बदलून बनावट रेकॉर्ड तयार केले, असा आरोप आहे.सात दिवसांची कोठडीकुमार यांना मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष स्नेही मान यांच्यापुढे हजर करण्यात आले. कुमार यांच्या चौकशीसाठी त्यांची १० दिवसांची कोठडी ‘सीबीआय’ने मागितली. मात्र न्यायालयाने सात दिवसांचा रिमांड दिला.

टॅग्स :Courtन्यायालय